Wednesday, May 2, 2018

#उद्योजकमहाराष्ट्र - माहिती



उद्योग-व्यवसायासंबंधी महत्वाची माहिती  ||  महाराष्ट्र उद्योजक  ||  नवीन उद्योग सुरू करताना  ||  सर्टिफिकेट

नमस्कार महाराष्ट्र!
आज #उद्योजकमहाराष्ट्र अंतर्गत व्यवसायासंबंधी उपयुक्त माहिती पाहुयात!
माहिती - @shubham_pb
आपण आपल्या सभोवताली अनेक असे लोक बघतो ज्यांना #व्यवसाय सुरू करायचा असतो पण योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांच्या #कल्पना अस्तित्वात येत नाही. कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की अनेक प्रश्नांची यादी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. सरकारी पातळीवर अनेक अशा योजना आहेत ज्याची माहिती आपल्या पर्यंत पोहोचत नाही त्यातीलच एक म्हणजे...

#EDP ( Entrepreneurship Development Program )   हे एक आठ ते दहा दिवसांत निवासी ट्रेनिंग असत याचं आयोजन #MCED #DIC दोघे मिळून करतात. ज्यामध्ये तुमची राहायची आणि जेवायची सोय स्वता #DIC करते.
या आठ ते दहा दिवसांमध्ये तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा किंवा तुमच्या कडे आधीपासूनच काही व्यवसाय संबंधी काही कल्पना असतील तर सुरवात कशी करायची ?
कुठल्या ऑफिस मध्ये जायचं ?
व्यवसाय करायला भांडवल कसं उभं करायचं?
प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा ?
प्रोजेक्ट रिपोर्ट कुठे SUBMIT करायचा ?
कर्ज कुठून मिळवायचं आणि त्याची एकंदरीत पूर्ण प्रक्रिया काय असते ?
अशा अनेक शंकांच्या बाबतीत मार्गदर्शन या ट्रेनिंग मध्ये दिलं जातं.

विशेषतः ग्रामीण भागात शेतीव्यतिरिक्त अजून कितीतरी व्यवसाय करता येतात ज्यासाठी सरकारच्या अनेक फायदेशीर योजना आहेत आपल्या शेतकरी बांधवांना त्याची कल्पना नसते. म्हणजे फक्त एक उदाहरण सांगतो अर्थातच हे फक्त शेतकऱ्यांनाच लागू होत असे नाही.

उदाहरण :
समजा एखाद्या व्यक्तीला कुक्कुटपालन सुरू करायच आहे आणि त्याला 10 लाखाची गरज आहे त्यांनी जर हे ट्रेनिंग घेतलं असेल तर त्यावेळी 50% सबसिडी अशी काही योजना असेल तर त्या व्यक्तीला 5 लाख रुपयेच परत करावे लागतात

वर सांगितल्या प्रमाणे हे फक्त शेती किंवा कुक्कुटपालन यासाठीच नाही तर प्रत्येक व्यवसायासाठी लागू आहे
पण प्रत्येक वेळी योजना ही वेगळी वेगळी असू शकते हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे

आता हे ट्रेनिंग घेण्यासाठी काय करायचं ?

तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तिथल्या #MCED / #DIC ऑफिसला भेट द्यावी तिथे तुम्हाला यासंबंधी किंवा अशा इतर योजनांसंबंधित संपूर्ण माहिती मिळेल.

टीप : प्रत्येक वेळी हे शिबीर मोफतच असेल असे नाही कधी कधी यासाठी काही फी सुद्धा भरावी लागते.

संपर्क :-


आमचा ईमेल - mhudyojakmandal@gmail.com
आमचा ब्लॉग - https://mhudyojakmandal.blogspot.in/
आमचं ट्वीटर हँडल - @mh_udyog
फेसबुक पेज - https://www.facebook.com/mh.udyog/
 
 

No comments:

Post a Comment

#उद्योजकमहाराष्ट्र - शेअर मार्केट

महाराष्ट्र उद्योजक मंडळ  ||  मराठी उद्योजक  ||  share market business शेअर बाजारातील व्यवसाय नमस्कार महाराष्ट्र! # उद्योजकमह...