Sunday, April 29, 2018

#महिलाउद्योजक



 #उद्योजकमहाराष्ट्र ||  महिलाउद्योजक  ||  महाराष्ट्र उद्योजक

नमस्कार महाराष्ट्र!

गुढीपाडव्याला #उद्योजकमहाराष्ट्र ही संकल्पना सुरू केली. एखादी संकल्पना फक्त सुरू करून उपयोग नसतो तर ती राबविण्यासाठी तितकीच मेहनत घ्यावी लागते. याबाबत आमच्याकडून दिरंगाई होत असेल तर क्षमा! पण आमच्या क्षमतेनुसार आम्ही पुर्णपणे प्रयत्न करत राहू.
👇👇👇

आज आम्ही #उद्योजकमहाराष्ट्र अंतर्गत दुसरा अत्यंत महत्वाचा उपक्रम सुरू करू इच्छितो!
#महिलाउद्योजक
उद्योजक हे केवळ पुरुषच असतात असं नाही. ते काही केवळ पुरुषांच्या मक्तेदारीचं क्षेत्र नाही. महिलाही या क्षेत्रात अत्यंत मेहनतीने काम करत असतात.
👇👇👇

आजही गावागावात अनेक कष्टकरी माता-भगिनी गृहोद्योग, महिला बचत गट सारख्या माध्यमातून एक प्रकारचा व्यवसायच करत असतात. शेतकऱ्याची पत्नी ही त्याची व्यवसाय भागीदारच असते.
👇👇👇

ही कामे बर्याेचदा घर-कुटुंब जबाबदारी सांभाळून पार्ट टाईमकेल्याने याला उद्योग म्हणायचं की नाही असा प्रश्न असतो. पण स्वतःच्या मेहनतीने, कौशल्याने काम करून मिळवलेला पैसा हा नक्कीच व्यवसाय म्हंटला गेला पाहिजे.
#महिलाउद्योजक
👇👇👇

उन्हाळा आला की वाळवण, कुरड्या, पापड, लोणाचं सारखे खाद्यपदार्थ बनवणे हा ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वाचा धागा आहे. ही संपूर्ण कामे महिलांच्या माध्यमातून होतात.
ह्या कालावधीतील अशा गृहोद्योग व बचत गटातून होणारी आर्थिक उलाढाल मोठी असते.
अशा महिला उद्योजकांना जर #उद्योजकमहाराष्ट्र ह्या व्यासपीठाचा थोडासाही लाभ झाला तर त्याचं आम्हाला समाधान असेल.

शिवाय, रांगोळी, मेहंदी, पर्स बनवणे इत्यादी सारख्या कलेच्या माध्यमातून अनेक मुली महिला काम करत असतात.
आपल्या ओळखीच्या अशा अनेक महिला असतील ज्या असा व्यवसाय करत असतील.
त्यांना, त्यांच्या उत्पादनाला आणि त्यांचे अनुभवाला जर आपण येथे स्थान देऊ शकलो तर सर्वांनाच आनंद होईल. 

केवळ कुरड्या, पापड्या, मसाले, लोणचे असं कुठेही मर्यादित न राहता कोणतीही महिला आपल्या कला-कौशल्याच्या माध्यमातून आपलं उत्पादन लोकांसमोर आणू इच्छित असेल तर सर्वांचं स्वागत आहे!

अनेक महिला, तरुणी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना जर आपले अनुभव share करायचे असल्यास त्यांचीही या उपक्रमाला खूप मदत होईल.
#उद्योजकमहाराष्ट्र
#महिलाउद्योजक

संपर्क
ईमेल - mhudyojakmandal@gmail.com
ट्विटर - @mh_udyog
ब्लॉग - mhudyojakmandal.blogspot.in

No comments:

Post a Comment

#उद्योजकमहाराष्ट्र - शेअर मार्केट

महाराष्ट्र उद्योजक मंडळ  ||  मराठी उद्योजक  ||  share market business शेअर बाजारातील व्यवसाय नमस्कार महाराष्ट्र! # उद्योजकमह...