Tuesday, May 8, 2018

#उद्योजकमहाराष्ट्र - शेअर मार्केटमहाराष्ट्र उद्योजक मंडळ  ||  मराठी उद्योजक  ||  share market business
शेअर बाजारातील व्यवसाय

नमस्कार महाराष्ट्र!

#उद्योजकमहाराष्ट्र अंतर्गत आज आपण अशा क्षेत्राबद्दल माहिती घेणार आहोत ज्याबाबतीत सामान्य माणसाला जितकं कुतुहुल असतं तितकीच भीतीही असते. ती उत्कंठा आणि भीती असण्यासाठी बर्‍याचदा ऐकीव माहिती कारणीभूत असते.
आपल्याला अंदाज आलाच असेल की मी कोणत्या क्षेत्राबद्दल बोलतो आहे. मी बोलत आहे #sharemarket या क्षेत्राबद्दल. तर #उद्योजकमहाराष्ट्र च्या ह्या धाग्यामधून आपण जाणून घेऊयात #शेअर_बाजार या क्षेत्रातील उद्योजकता याबद्दल.

शेअर बाजार हे पैसे गुंतवणुकीचं एक माध्यम आहे. अठरा वर्षांवरील कोणताही व्यक्ति या क्षेत्रात गुंतवणूक करू शकतो. जसे बँकेत पैसे ठेऊन त्याचा व्याज मिळतो, ज्याला आपण Returns म्हणतो तसेच Returns शेअर गुंतवणुकीतून अपेक्षित असतात.

शेअर बाजारात सामान्यतः दोन प्रकारचे लोक पैसे लावतात. एक म्हणजे #Investors जे दीर्घकालीन गुंतवणूक करतात. यांच्याकडे असलेले पैसे हे भविष्यात चांगले Returns मिळतील या अपेक्षेने ते shares मध्ये गुंतवतात अन त्यात रोजचं फार उलाढाल करत नाहीत.

दुसरे असतात #Traders. यांचा हेतु असतो तो कमी कालावधीत जास्त पैसे कमावणे. याला सामान्य माणूस सट्टेबाजी म्हणतो. साधारणतः यांच्यामुळेच सामान्य जणांना या क्षेत्राबद्दल कुतुहुल अन भीती निर्माण होते. कारण नफा अन नुकसानीचे आकडे आणि अनुभव यांच्याकडूनच मोठ्या प्रमाणात येत असतात.
हे झालं शेअर बाजार म्हणजे काय असतो त्याबद्दल. आता बघूयात याच्यात उद्योग/व्यवसाय कसा असू शकतो.

जर तुम्हाला शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला Demat Account सुरू करावं लागतं. हे Demat Account सुरू करण्यासाठी विविध कंपनी (DP) असतात ज्या ही सेवा देतात. या कंपन्यांचे विविध शहरात/गावात Dealers असतात ज्यांना आपण Broker म्हणतो. म्हणजे त्या Broker च्या माध्यमातून त्या कंपनीची (DP) Demat Account Service आपल्याला घेता येते.

आता हा Broker होणं म्हणजेच आपला स्वतःचा Share Broker चा व्यवसाय असणं.
Broker होण्यासाठी काय बाबींची आवश्यकता असते ते पाहुयात?
1.  तुम्हाला स्वतःला शेअर बाजराबद्दल मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.
2.  दुसरं म्हणजे NISM (National Institute of Securities Markets) चे एक ते दोन Certificates असणं आवश्यक आहे.
3.  शिक्षणाची साधारणपणे कसलीही अट नाही.
4.  शेअर बाजारसंबंधित ऑफिसमध्ये कामाचा अनुभव असेल तर उत्तम.

कंपनीची (DP) Franchise घेत असताना, म्हणजेच Broker म्हणून काम सुरू करत असताना तुम्हाला कंपनीला काही Deposit द्यावं लागतं.  
जर तुमच्याकडे कसलाही अनुभव नाही, माहिती नाहीत पण या क्षेत्रात कार्यरत होण्याची इच्छा आहे तर मग Classes हा त्यावर उपाय असू शकतो. शहराशहरांत Share Market Classes आहेत किंवा Online Classes ही उपलब्ध आहेत. तेथून तुम्ही या क्षेत्राबद्दल माहिती घेऊ शकता. 

जेंव्हा तुम्ही Broker होता तेंव्हा पैसे कसे मिळतात?

यामध्ये जे काही Earning असतं ते Brokerage च्या माध्यमातून येणं अपेक्षित आहे. जेंव्हा तुमच्याकडे Clients येतात अन Demat Account सुरू करतात तेथे Earning होतं. आणि जेंव्हा तुमच्याकडे असलेले Clients shares चे खरेदी-विक्री व्यवहार करतात त्या व्यवहारावर कंपनी (DP) brokerage आकारात असते. त्या Brokerage मधील एक भाग तुम्हाला मिळतो तेथे तुमच्या उद्योगाचं खरं Earning होतं.
येथे Broker ने Client कडून कसलेही पैसे आकाराने अपेक्षित नसतं. तो Client नियमित खरेदी-विक्री व्यवहारात Broker ला कसलेही पैसे देणे लागत नाही.

हा व्यवसाय पार्ट टाइम करता येतो का?

हो. हे शक्य आहे. सुरुवातीला सर्व माहिती घेऊन आणि शिकून या व्यवसायात उतरता येतं आणि मग हा व्यवसाय तुम्ही जोडधंदा म्हणून करू शकता. फक्त योग्य व्यक्तींची निवड आणि साथ येथे महत्वाची असते.

तुमच्या जर चांगल्या ओळखी असतील अन चांगला Client बेस तयार झाला तर घरून सुद्धा ह्या व्यवसाय तुम्ही करू शकता.

भांडवलाच्या बाबतीत फार अडचण येत नाही. सुरूवातीला कंपनीला Deposit द्यावं लागतं. तुमच्याकडे स्वतःचा लॅपटॉप आणि इंटरनेट इतकच मूलभूत भांडवल.संपर्क - Contact

आपला ईमेल आयडी ||  Email Id


आपलं ट्वीटर हँडल ||  Twitter
@mh_udyog

आपला ब्लॉग  ||  Blog

आपलं फेसबुक पेज लिंक  ||  Facebook Page
 


 

Wednesday, May 2, 2018

#उद्योजकमहाराष्ट्र - माहितीउद्योग-व्यवसायासंबंधी महत्वाची माहिती  ||  महाराष्ट्र उद्योजक  ||  नवीन उद्योग सुरू करताना  ||  सर्टिफिकेट

नमस्कार महाराष्ट्र!
आज #उद्योजकमहाराष्ट्र अंतर्गत व्यवसायासंबंधी उपयुक्त माहिती पाहुयात!
माहिती - @shubham_pb
आपण आपल्या सभोवताली अनेक असे लोक बघतो ज्यांना #व्यवसाय सुरू करायचा असतो पण योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांच्या #कल्पना अस्तित्वात येत नाही. कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की अनेक प्रश्नांची यादी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. सरकारी पातळीवर अनेक अशा योजना आहेत ज्याची माहिती आपल्या पर्यंत पोहोचत नाही त्यातीलच एक म्हणजे...

#EDP ( Entrepreneurship Development Program )   हे एक आठ ते दहा दिवसांत निवासी ट्रेनिंग असत याचं आयोजन #MCED #DIC दोघे मिळून करतात. ज्यामध्ये तुमची राहायची आणि जेवायची सोय स्वता #DIC करते.
या आठ ते दहा दिवसांमध्ये तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा किंवा तुमच्या कडे आधीपासूनच काही व्यवसाय संबंधी काही कल्पना असतील तर सुरवात कशी करायची ?
कुठल्या ऑफिस मध्ये जायचं ?
व्यवसाय करायला भांडवल कसं उभं करायचं?
प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा ?
प्रोजेक्ट रिपोर्ट कुठे SUBMIT करायचा ?
कर्ज कुठून मिळवायचं आणि त्याची एकंदरीत पूर्ण प्रक्रिया काय असते ?
अशा अनेक शंकांच्या बाबतीत मार्गदर्शन या ट्रेनिंग मध्ये दिलं जातं.

विशेषतः ग्रामीण भागात शेतीव्यतिरिक्त अजून कितीतरी व्यवसाय करता येतात ज्यासाठी सरकारच्या अनेक फायदेशीर योजना आहेत आपल्या शेतकरी बांधवांना त्याची कल्पना नसते. म्हणजे फक्त एक उदाहरण सांगतो अर्थातच हे फक्त शेतकऱ्यांनाच लागू होत असे नाही.

उदाहरण :
समजा एखाद्या व्यक्तीला कुक्कुटपालन सुरू करायच आहे आणि त्याला 10 लाखाची गरज आहे त्यांनी जर हे ट्रेनिंग घेतलं असेल तर त्यावेळी 50% सबसिडी अशी काही योजना असेल तर त्या व्यक्तीला 5 लाख रुपयेच परत करावे लागतात

वर सांगितल्या प्रमाणे हे फक्त शेती किंवा कुक्कुटपालन यासाठीच नाही तर प्रत्येक व्यवसायासाठी लागू आहे
पण प्रत्येक वेळी योजना ही वेगळी वेगळी असू शकते हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे

आता हे ट्रेनिंग घेण्यासाठी काय करायचं ?

तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तिथल्या #MCED / #DIC ऑफिसला भेट द्यावी तिथे तुम्हाला यासंबंधी किंवा अशा इतर योजनांसंबंधित संपूर्ण माहिती मिळेल.

टीप : प्रत्येक वेळी हे शिबीर मोफतच असेल असे नाही कधी कधी यासाठी काही फी सुद्धा भरावी लागते.

संपर्क :-


आमचा ईमेल - mhudyojakmandal@gmail.com
आमचा ब्लॉग - https://mhudyojakmandal.blogspot.in/
आमचं ट्वीटर हँडल - @mh_udyog
फेसबुक पेज - https://www.facebook.com/mh.udyog/
 
 

#उद्योजकमहाराष्ट्र - शेअर मार्केट

महाराष्ट्र उद्योजक मंडळ  ||  मराठी उद्योजक  ||  share market business शेअर बाजारातील व्यवसाय नमस्कार महाराष्ट्र! # उद्योजकमह...