Friday, April 20, 2018

उद्योजक महाराष्ट्र उपक्रम


नमस्कार महाराष्ट्र,
मराठी माणूस व्यवसायात मागे पडतो असं म्हणतात पण ते काही खरं नाही. तसं असतं तर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात व्यवसाय उभे राहुच शकले नसते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात असे अनेक उद्योग-व्यवसाय आहेत जे केवळ मार्केटिंग च्या अभावामुळे मागे पडले असावेत. व्यवसाय करत असताना कधीही आपल्याकडे असलेल्या सकारात्मक बाबींचं प्रदर्शन करून नवनवीन लोकांना जोडलं पाहिजे.

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात हिरीरीने कारभार करणार्‍या अनेक लहान-मोठ्या उद्योगसमूहाला, व्यावसायिकाला सोशल मीडिया वर हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून आज मराठी नववर्ष गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही महाराष्ट्र उद्योजक मंडळ ह्या ट्विटर हँडलची सुरुवात करत आहोत!

महाराष्ट्राच्या कुठल्याही गावात, तालुक्यात, जिल्ह्यात कार्यरत असलेला व्यवसाय, उद्योगसमूह ट्विटरवरील जास्तीत जास्त मंडळींसामोर पोहोचवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे कार्य करत राहू.!
आजच्या डिजिटल युगात व्यवसायवृद्धीसाठी सोशल माध्यमांचा वापर करणे हे अत्यंत महत्वपूर्ण झालेलं आहे. आपल्या कामाची ओळख अनेकांना व्हावी अन व्यवसायात वाढ होत राहावी यासाठी उचललेलं हे एक छोटसं पाऊल म्हणता येईल.!

#उद्योजकमहाराष्ट्र हा हॅशटॅग वापरुन आणि आमचं हँडल @mh_udyog ला मेंशन करून तुम्ही आपल्या व्यवसाय, उद्योगसमुहाबद्दलची माहिती टाकू शकता. तुम्ही तुमच्या व्यवसाय, उद्योगसमुहाच्या ट्विटर हँडल वरून ट्विट टाकत असाल टीआर ते ट्विट थेट आम्हाला DM करू शकता. 

व्यवसाय कुठलाही असोत, तुमची आयटी कंपनी असेल, शोरूम असेल, हॉटेल असेल, सेवा केंद्र असेल, खानावळ असेल, सलूनचं दुकान असेल किंवा अजून काहीही असू देत... सर्वांना याअंतर्गत सहभाग नोंदवता येईल.

मुख्य हेतु असा की महाराष्ट्रातील विविध उद्योग-व्यवसाय ट्विटर एका छत्राखाली, एका व्यासपीठावर दिसावेत अन मराठी माणसाचा उत्कर्ष होत राहावा!!!

मराठी उद्योजकाला पुढे नेण्यासाठी ही संकल्पना जन्मास घातली आहे हे आमच्या कायम लक्षात असेल. या खात्यावरून इतर कसल्याही गोष्टींना समर्थन अथवा विरोध केला जाणार नाही...

या संपूर्ण उपक्रमात तुमच्या सर्वांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या सूचना व संकल्पना आम्ही नक्की लक्षात घेऊ. चुकत असू तर तेही सांगा!!! अजून हँडल पूर्णतः सुरू झालेलं नाही. आम्ही आपल्या सर्वांच्या सूचनांची वाट बघत आहोत... काही सुचवायचे असल्यास रीप्लाय द्या अथवा DM करा...

Twitter - @mh_udyog  ||  mhudyojakmandal@gmail.com

Admin
अभिषेक बुचके  || Twitter  @Late_Night1991  ||  latenightedition.in


शुभम बानुबाकोडे (अमरावती) || Twitter - @shubham_pb  ||  shubhambanubakode.wordpress.com



अंकित देशमुख (परभणी/चेन्नई)  ||  Twitter - @ankith_official


अक्षय लहाणे  ||


दर्शन हिप्पळगावकर  || @drshn_h

No comments:

Post a Comment

#उद्योजकमहाराष्ट्र - शेअर मार्केट

महाराष्ट्र उद्योजक मंडळ  ||  मराठी उद्योजक  ||  share market business शेअर बाजारातील व्यवसाय नमस्कार महाराष्ट्र! # उद्योजकमह...